चपलेने केला हत्या प्रकरणाचा उलगडा

चपलेने केला हत्या प्रकरणाचा उलगडा

Crime story's
नवी मुंबई/पनवेल - आधी प्रेमसंबंध व त्यानंतर प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने प्रेयसीची मित्राच्या साहाय्याने हत्या केली, मात्र त्या हत्येमधील मारेकरी एका चपलेने पोलिसांना मिळाले. 
5 दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यातील धामणी येथे उड्डाणपूल जवळ एका महिलेचा मृतदेह आढळला होता, सदर महिला ही एका बार मध्ये काम करीत होती, त्या महिलेचे व घणसोली मधील जिम मध्ये ट्रेनर चे प्रेमसंबंध जुळले होते. Maharashtra crime
काही दिवस सर्व काही व्यवस्थित सुरू होते, मात्र त्यानंतर त्या महिलेने लग्न करण्याचा तगादा लावला, दोघांची ज्यावेळी भेट व्हायची त्यावेळी ती महिला वारंवार लग्नाची विचारणा करायची, तिच्या मागणीला ट्रेनर कंटाळला आणि त्या महिलेपासून विभक्त होण्यासाठी मित्राला विचारणा केली असता दोघांनी त्या महिलेचा काटा काढण्याचे ठरविले.
 
त्यांनतर त्या महिलेला भेटायला बोलाविले असता दोघांचा वाद उफाळला, आरोपी ट्रेनर व त्याचा मित्र दोघांनी त्या महिलेचा गळा आवळून खून करीत धामणी उड्डाणपूलाच्या खाली मृतदेह फेकून पसार झाले. Crime murder news
याबाबत पनवेल गुन्हे अन्वेषण विभागाने तपास सुरू केला असता आधी त्यांच्या हाती काही लागले नाही त्यानंतर महिलेच्या पायातील चप्पल ने हत्या प्रकरणाचा उलगडा केला.
महिलेच्या पायात सापडलेली चप्पल चा शोध पोलिसांनी घेत दुकानाचे सीसीटीव्ही तपासले असता त्यांना ती महिला आपल्या मैत्रिणीसह चप्पल खरेदी करण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाल्यावर ती महिला बार मध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळाली, पोलिसांनी त्या आधारे तपास करीत आरोपी ट्रेनर व त्याच्या मित्राला अटक केली.
आरोपी चे अजून कुणासोबत संबंध आहे काय? या बाबत पनवेल पोलीस तपास करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने