मूल येथे सायकल चोरट्यास अटक

मूल येथे सायकल चोरट्यास अटक

Crime storys गुरू गुरनुले
मूल - कोचिंग मध्ये गेलेल्या विद्यार्थिनींची AVON कंपनीची सायकल चोरणाऱ्या आरोपीला मूल पोलिसांनी अटक केली.
28 डिसेंम्बरला नवभारत शाळेच्या मागे असलेल्या कोचिंग मध्ये गेलेल्या विद्यार्थिनींची सायकल अज्ञाताने चोरली होती, याबाबत विजय सोनूले यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. Chandrapur crime news
सायकल चोरीच्या गुन्ह्याचा शोध घेत असताना 29 डिसेंम्बरला पुन्हा एकाच्या घरासमोरून अज्ञाताने सायकल चोरत ती सायकल सोबत घेत चंद्रपूर च्या दिशेने घेऊन जात होता, याबाबत मूल पोलिसांना माहिती देण्यात आली असती पोउपनी राठोड यांनी चमुसह चंद्रपूरच्या मार्गावर निघाले असता त्यांनी आदर्शखेडा मूल येथील विलास शेंडे याला ताब्यात घेण्यात आले. Bicycle thief
आरोपी शेंडे याची कसून चौकशी केली असता पहिल्या गुन्ह्यातील सायकल ही मूल तहसील कार्यालयजवळ लपवून ठेवली असल्याचे सांगितले, मूल पोलिसांनी 2 सायकली आरोपिकडून जप्त करीत 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Maharashtra crime news
सदर कार्यवाही ही उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मल्लीकार्जून इंगळे सा व पो. नि. सतीशसिंह राजपूत सा यांचे मार्गदर्शनात पोउपनि पुरुषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी देवकते, संजय जुगनाके, श्रावण कुत्तरमारे यांनी केली असुन तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने