भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

Crime story's
ठाणे - शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिंदे गटाने भाजप सोबत युती करीत राज्यात सरकार स्थापन केले, मात्र या युतीचे रूपांतर शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात वादात झाले आहे. Thane crime
Maharashtra crime news
वागळे इस्टेट परबवाडी भागात भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून तो हल्ला शिंदे गटातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असा आरोप भाजपने लावला आहे. Shinde bjp
भाजपचे पदाधिकारी प्रशांत जाधव हे परबवाडी येथे राहतात, गुरुवारी फलक बसविण्याच्या कारणावरून शिंदे गट व भाजपात वाद झाला होता. 
त्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांना समज देत वाद मिटविला होता. Shinde vs bjp
मात्र शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास प्रशांत जाधव यांच्यावर 15 ते 20 जणांच्याया टोळक्याने प्राणघातक हल्ला केला, या हल्ल्यात जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
हा हल्ला शिंदे गटातील माजी नगरसेवकांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप करीत भाजपने ट्विट केले आहे, ट्विटरवर भाजप ठाणे या आयडी वरून शिंदे गटावर आरोप करण्यात आले आहे. Thane crime
या वादानंतर भाजप व शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस बाहेर आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने