चंद्रपूर शहरात सुगंधित तंबाखू तस्करांवर कारवाई

चंद्रपूर शहरात सुगंधित तंबाखू तस्करांवर कारवाई

Crime story's
चंद्रपूर - मागील अनेक वर्षांपासून चंद्रपुरात सुगंधित तंबाखूचा अवैध धंदा सुरू आहे, मात्र प्रशासन सुद्धा यावर आळा घालण्यास अयशस्वी ठरले आहे. Tobacco smuggling
सुगंधित तंबाखूमुळे चंद्रपूर जिल्ह्यात तोंडाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात पाय पसरत आहे, काही दिवसांपूर्वी वसीम झिमरी यांच्या गोदामावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष चमूने धाड मारली होती. Chandrapur crime
आता पुन्हा चंद्रपुरातील सुगंधित तंबाखू तस्कर म्हणून प्रसिद्ध असलेल्या रयतवारी येथील गुप्ता यांच्या घरी गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर पोलीस स्टेशनमधील गुन्हे अन्वेषण शोध पथकाने धाड मारली. Final Gutkha
या कारवाई गुप्ता यांच्या घरी सुगंधित तंबाखू चे बॉक्स, विमल गुटखा असा एकूण 1 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी मुकेशकुमार गुप्ता याला ताब्यात घेतले आहे. Oral cancer
रयतवारी येथे गुप्ता यांचं पान मटेरियल चे दुकान आहे, त्या आड ते सुगंधित तंबाखूची विक्री मागील अनेक वर्षांपासून करीत आहे, यापूर्वी गोंदिया येथे सुगंधित तंबाखू भरलेला त्यांचा ट्रक जप्त करण्यात आला होता.
मात्र या सुगंधित तंबाखू तस्करांवर प्रशासन मेहरबान आहे की काय असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो.
विशेष म्हणजे 26 डिसेंम्बरला रात्री झालेल्या या कारवाईत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे, याआधी वडगाव येथील घरफोडी बद्दल सुद्धा अशीच गुप्तता पोलिसांनी पाळली होती.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने