चोरीचा अजब प्रकार

चोरीचा अजब प्रकार

Crime story's
बुलढाणा - जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मादणी चोरीचा अजब प्रकार उघडकीस आला आहे, आपण अनेकदा चोरांच्या नवीन युक्त्या बघतो मात्र या चोरीबद्दल आपणही काही वेळासाठी अवाक झाल्याशिवाय राहणार नाही. Buldhana crime
गावातील सुभाष चव्हाण हे काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते, घरी कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यानी त्यांच्या घरात प्रवेश केला. Maharashtra crime news
चोरांनी संपूर्ण घर तपासले, सोने-चांदी व रोख रक्कम त्यांना मिळाली नाही, मग त्यांची नजर एका कपाटावर पडली, मात्र त्याची चावी न मिळाल्याने चोरीचा बेत फसतो की काय? असा विचार त्यांच्या मनात आला, त्यानंतर त्यांनी कसलाही विचार न करता थेट कपाट उचलून नेले.
गावाजवळ असलेल्या गोदरीत चोरांनी ते कपाट नेले, त्यानंतर त्याचे कुलूप फोडत त्यामधील काही मौल्यवान वस्तू सापडते की काय याचा शोध घेतला, मात्र कपाटात काही न मिळाल्याने चोरांनी कपाट तिथे टाकून पळ काढला.
26 डिसेंबर ला सकाळच्या सुमारास गावकऱ्यांना ते कपाट नजरेस पडले असता त्यांनी याबाबत अनेकांसोबत चर्चा केली असता गावातील चव्हाण हे घरी नसल्याचे त्यांना कळले. Maharashtra crime news
चव्हाण यांच्या घरी गावकऱ्यांनी जाऊन बघितले असता सर्व सामान अस्तव्यस्त दिसले, घरी काही न मिळाल्याने चोरांनी सुद्धा पळ काढला होता याबाबत दिवसभर गावात चर्चा सुरू आहे.
मेहकर येथे सुभाष चव्हाण यांच्या मुलीचा कुंकू चा कार्यक्रम असल्याने ते मेहकर येथे गेले होते.
चोरीच्या प्रयत्नांची बाब कळल्यावर चव्हाण यांनी डोण पोलिसात तक्रार दिली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने