सावत्र वडीलाने केली 20 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

सावत्र वडीलाने केली 20 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

Crime story's
पंजाब - सावत्र बापाने आपल्या 20 वर्षीय मुलाची निर्घृणपणे हत्या केली इतकेच नव्हे तर हत्या केल्यावर मृतदेहाचे हात-पाय बांधत एका प्लास्टिक च्या ड्रम मध्ये टाकत, त्यात सिमेंटने प्लास्टर करीत तो ड्रम कायमस्वरूपी बंद केला. Punjab crime
या घटनेबाबत मृतकाच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली, मात्र आरोपी बाप हा पसार झाला.
लुधियाना च्या सलेम टाबरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे हत्याकांड घडले. Brutal murder
पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर सविता यांनी दुसरे लग्न दिर विवेकानंद मंडल उर्फ सप्पू मंडल यांच्यासोबत केले, सविता यांना पहिल्या पतीपासून 20 वर्षाचा पियुष नामक मुलगा होता, त्याच व दुसऱ्या वडिलांचं आपसात पटत नव्हते. India crime news
नेहमी दोघांचे भांडण व्हायचे, पियुष हा 5 डिसेंम्बर पासून गायब होता, त्याबाबत सविता यांनी पतीला विचारणा सुद्धा केली पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सविता यांचा संशय बळावला.
सविता घराच्या छतावर गेली असता त्यांना तिथे एक ड्रम आढळला, त्या ड्रम मधून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली होती.
ड्रम ला सिमेंटचे प्लास्टर करण्यात आले होते, ड्रम जेव्हा फोडण्यात आला त्यामध्ये पियुषचा मृतदेह मिळाला, याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली, सविता यांनी पतीने मुलाची हत्या केल्याचा आरोप लावला, पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदन साठी पाठवला असून आरोपी वडील अद्याप फरार आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने