71 वर्षीय आजोबांचा धडावेगळा मृतदेह आढळल्याने खळबळ

71 वर्षीय आजोबांचा धडावेगळा मृतदेह आढळल्याने खळबळ

Crime story's
लातूर - जिल्ह्यातील बाभळगाव-बोरी येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या वृद्धाचे शीर धडावेगळे करीत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली. Brutal murder in latur 

बशीर मदार शेख असे मृतकाचे नाव आहे, शेख यांच्या मृतदेहाचे हात, पाय आणि शिराचे तुकडे पोलिसांना आढळल्यावर त्यांनी अज्ञाताविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. Latur crime
वृद्धांची अत्यन्त क्रूर पणे हत्या करण्यात आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बशीर शेख हे बाभळगाव येथील रहिवासी असून गावापासून 2 किलोमीटर अंतरावर त्यांचे शेत आहे, रात्री वीज असल्याने मृतक शेख हे रात्री 9 वाजेदरम्यान शेतात पाणी देण्यासाठी गेले होते.
दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी जेवणाचा डबा घेऊन शेतात गेली होती, मात्र बशीर त्यांना कुठेही आढळून आले नाही, ते नातेवाईकांकडे गेले असतील असे त्यांना वाटले. Maharashtra crime news
मात्र आज सकाळी गावातील कुत्रे तोंडात हात घेऊन जाताना नागरिकांना दिसल्यावर याबाबत पोलिसांना सूचित करण्यात आले.
लातूर ग्रामीण पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले, मृतक शेख यांच्या पत्नी व मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.
विशेष म्हणजे 2 दिवसांनी शेख यांच्या मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी आढळले, 71 वर्षीय बशीर शेख यांचा स्वभाव अत्यन्त मनमिळाऊ वृत्ती चा होता, त्यांचा कुणासोबत वाद ही नव्हता, कुणी हिंस्त्र प्राण्याने सदर कृत्य केले असा संशय पोलिसांना आधी होता त्यासाठी वनविभागाला सुद्धा पाचारण करण्यात आले, मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर कृत्य हे वन्यजीवांचे नसून त्यांचा घात केला असावा असा संशय व्यक्त केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने