चंद्रपुरात प्लॉट धारकांची 41 लाखांने फसवणूक

चंद्रपुरात प्लॉट धारकांची 41 लाखांने फसवणूक

Crime story's
चंद्रपूर - एकदा पैसे जमा करा व दर महिन्याला मिळवा आकर्षक व्याजासाहित रक्कम, अश्या आमिषाला नागरिक अनेकदा बळी पडले आहे, मात्र आजही अनेक नागरिक अश्याया आमिषाला बळी पडतच आहे. 

असाच एक प्रकार चंद्रपुरातील दुर्गापूर येथे उघडकीस आला आहे, तुकुम येथील 38 वर्षीय भरत नानाजी धोटे यांनी भार्गवी लँड अँड डेव्हलपर्स च्या नावाने खाजगी मर्यादित कंपनी स्थापन केली, त्यानंतर खाजगी एजंट नेमत प्लॉट विक्रीचा गोरखधंदा सुरू केला. Fraud
पद्मापुर येथील प्लॉट क्रमांक 123/01 (क), 123/01 (ड), 123/01(इ) वरील जागेवर 1000 चौरस फुटाचा प्लॉट 30 महिन्यासाठी किंमत अडीच लाख हा युनिव्हर्स ऍग्रो टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड च्या नावाने करार करीत, त्या प्लॉट वर कुट्याचे बांधकाम करीत प्रत्येक प्लॉट धारकाला महिन्याचे 7 हजार 83 रुपये दर महिन्याला प्लॉट धारकाच्या बँक खात्यात 30 महिन्यासाठी जमा करण्यात येईल. Chandrapur police
पर्यटकांना रिसॉर्ट प्रमाणे सदर कुट्या किरायाने देत त्यांच्याकडून मिळणाऱ्या उत्पन्नातून सदर रक्कम प्लॉट धारकाला देण्यात येईल असे आमिष देण्यात आले.
त्यानंतर एप्रिल मे महिन्यात प्लॉट धारकांच्या नावाने वेगवेगळ्या प्लॉट ची रजिस्ट्री करण्यात येणार, अश्या प्रमाणे सर्व प्लॉट धारकांना आमिष देण्यात आले, धोटे यांनी 15 ते 16 नागरिकांकडून अडीच लाखांची रक्कम Google pay, phone pay, Rtgs मार्फत जमा केली.
सदर प्लॉट चा करारनामा भार्गवी लँड अँड डेव्हलपर्स च्या नावाने स्टॅम्प पेपर वर नोटरी करीत विसारपत्र युनिव्हर्स ऍग्रो टुरिझम नावाने स्वतः भरत धोटे यांनी करारनामा जानेवारी महिन्यात करून दिला.
त्यानंतर पुढील 2 महिने काही प्लॉट धारकांच्या खात्यात 7 हजार 83 रुपये जमा करण्यात आले, मात्र त्यानंतर पैसे येणे बंद झाले व प्लॉट धारकांना रजिस्ट्री करून देण्यात आल्या नाही.
या प्रकरणात फिर्यादी म्हाडा कॉलनी दाताला निवासी अशोक पांडुरंग भटवलकर यांनी भरत धोटे भार्गवी लँड अँड डेव्हलपर्स च्या नावाने खाजगी कम्पनी स्थापण करीत प्लॉट धारकांची तब्बल 41 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दुर्गापुर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली. Maharashtra crime news
दुर्गापूर पोलिसांनी फसवणूक प्रकरणात भरत धोटे यांच्यावर कलम 420, 406, 467 व 468 अन्वये गुन्हा दाखल केला. Chandrapur crime
आरोपी भरत धोटे यांनी भार्गवी लँड अँड डेव्हलपर्स च्या नावाने कोणत्याही नागरिकांची फसवणूक केली असल्यास तात्काळ दुर्गापूर पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी नागरिकांना केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने