त्या सराईत गुन्हेगाराची सिंदेवाही पोलिसांनी घेतली झडती

त्या सराईत गुन्हेगाराची सिंदेवाही पोलिसांनी घेतली झडती

Crime storys
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल होताच सिंदेवाही पोलिसांनी तपासाचे चक्र गतीमान करत आरोपीच्या शोध घेत चोरी प्रकरणातील फरार आरोपी नामे शुभम प्रल्हाद शेंडे, वय 26 वर्ष, रा. चामोर्शी रोड, कॅम्प एरिया, गडचिरोली, हा चंद्रपुर परिसरात मिळून आला असून त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
burglary
सदर आरोपिकडुन एक बिना नंबरची HF Deluxe मोटार सायकल, एक बिना नंबरची सुझुकी एक्सेस मोपेड गाडी या दोन दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपीने घरफोडी गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल गडचिरोली येथे त्याचे घरी लपवून ठेवल्याचे कबुली दिल्याने आरोपीचे घरून सदर घरफोडी गुन्हयातील एकूण 1 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Chandrapur crime
तसेच सिंदेवाही पोलीस स्टेशन ला दि. 20/09/2022 रोजी अप क्र 243/2022 कलम 379 भादवि अनव्ये गुन्हा नोंद असून सदर चोरीस गेलेली पॅशन प्रो मोटार सायकल क्र MH 34 AT 1641 असा एकूण 3,15,000 रुपयेचा माल जप्त करण्यात आलेला आहे. Maharashtra crime
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस ठाणेदार योगेश घारे, पोलीस हवालदार बावणे, ज्ञानेश्वर डोकळे, राहुल रहाटे, मंगेश मातेरे, रणधीर मदारे, अरविंद मेश्राम यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने