योग शिक्षकचं निघाला गांजा तस्कर

योग शिक्षकचं निघाला गांजा तस्कर

Crime story's
चेन्नई - करो योग रहो निरोग, असा कानमंत्र योगामधील आहे, मात्र या योग शिक्षणाच्या आड एकाने तर कमालच केली आहे. Chennai crime
योगामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत 29 वर्षीय दिनेश नामक योग शिक्षक हा विविध जिम मध्ये योग शिक्षक म्हणून काम करतो, दिनेश हा 3 जिम मध्ये योग प्रशिक्षण देण्याचं काम करीत होता.
जिम मध्ये अनेक नागरिक वाढत्या वजनाने त्रस्त होत मानसिक ताणतणावात असतात, मात्र या गोष्टीचा अचूक फायदा योग प्रशिक्षक दिनेश ने घेतला आहे.
India crime news
जे नागरिक दिनेश कडे समस्या घेऊन येत होते तो सर्वाना तणाव कमी करण्यासाठी भांगाचे सेवन करायला सांगत होता. Yoga teacher Selling Ganja
ग्राहकांना गांजा कमी न मिळावा यासाठी खुद्द दिनेश ने गांजा तस्करीचा व्यवसाय सुरू केला, पेरुंगलाथूर बस स्थानक परिसरात अंमली पदार्थाची तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
तेवढ्यात पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले त्याच्याजवळ असलेल्या मोठ्या बॅगेत तब्बल 10 किलो गांजा पोलिसांना मिळून आला.
पोलिसांनी गांजा जप्त करीत आरोपी योग शिक्षक दिनेश ला ताब्यात घेतले, पोलिसांनी दिनेश वर अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने