पतीला संपविण्यासाठी पत्नीने दिली 30 हजार रुपयांची सुपारी

पतीला संपविण्यासाठी पत्नीने दिली 30 हजार रुपयांची सुपारी

Crime story's
अकोला - 28 डिसेंम्बरला सकाळी 8 वाजताच्या सुमारास दहीहंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ग्राम पुंडा येथे व्यायाम करणाऱ्या लोखंडी अँगल ला सचिन बांगर हे गळफास घेतल्या अवस्थेत आढळले होते.
पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनेचा पंचनामा केला असता सचिनच्या अंगावर जखमा तसेच दोरी बांधल्याच्या व्रण पोलिसांना आढळून आल्या, पोलिसांचा संशय बळावला ही आत्महत्या नसून त्याचा हत्येच्या अँगल ने तपास सुरू केला. 

पोलिसांनी चौकशी सुरू करीत सचिन यांच्या वैधकीय अहवालाचा प्राथमिक अंदाज प्राप्त केला असता सचिन ची हत्या करण्यात आली अशी माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी सचिन ची पत्नी कांचन ला चौकशी साठी बोलाविले असता तिने आधी उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली, पोलिसांनी कांचन ची कसून चौकशी केली असता काही धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली.
पत्नी कांचन ने पती सचिन ची हत्या केल्याचे उघडकीस झाले.
सचिन व कांचन चा विवाह झाल्यापासून काही दिवस दोघे व्यवस्थित होते मात्र सचिन ला दारूचे अति व्यसन लागल्याने तो पत्नी कांचन ला मारहाण व त्रास देऊ लागला.
सचिन च्या त्रासाला कंटाळून मागील अडीच वर्षांपासून कांचन माहेरी राहत होती.
मात्र तिथेही सचिन कांचन ला त्रास देऊ लागला, सचिन च्या त्रासाला कंटाळत कांचन ने पती चा काटा काढण्याचा कट रचला, गावातील दिगंबर पसार ला कांचन ने सचिन ला ठार मारण्यासाठी 30 हजार रुपये देतो असे आमिष देत त्याला करत सहभागी केले.
त्यानंतर दिगंबर ने सचिन ला कांचन च्या राहत्या घरी दोरीने गळा आवळला, सचिन मृत झाल्यावर त्याचा मृतदेह गावाबाहेरील व्यायाम शाळेच्या अँगल ला सचिन ला गळफास लावत त्याने आत्महत्या केली असे भासवले.
पोलिसांनी कांचन व दिगंबर पसार यांना सचिन च्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने