इलेक्ट्रिक कटरचा वापर करीत त्याने केले पत्नीचे तुकडे

इलेक्ट्रिक कटरचा वापर करीत त्याने केले पत्नीचे तुकडे

Crime story's
झारखंड - संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या श्रद्धा वालकर या हत्याकांडाची शाई अजून सुकत नाही तर त्यानंतर असे अनेक गुन्हे आजही घडत आहे.
झारखंड राज्यातील साहिबगंज मधून असाच एक हादरविणारा प्रकार घडला आहे. Jharkhand crime
25 वर्षीय दिलदार अन्सारी ने पत्नी 22 वर्षीय रुबिका पहारिया यांची हत्या करीत तिच्या मृतदेहाचे 12 हुन अधिक तुकडे केले.
रुबिका ही आदिम पहारिया या समाजाची होती, ती दिलदार ची दुसरी पत्नी होती.
मागील 2 वर्षांपासून दोघे एकत्र राहत होते. मात्र अचानक एक दिवस रुबिका बेपत्ता झाली, त्याबाबत कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा नोंदविली होती. India crime news
स्थानिक पोलिसांनी रुबिका चा शोध घेण्यास सुरुवात केली असता शनिवारी सायंकाळी मोमीन टोलाच्या अंगणवाडी भवनामागील कुत्र्याच्या समूहाने काही मांसाचे तुकडे खात असल्याचे चित्र अनेकांना दिसले, सदर माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी त्याठिकाणी जाऊन बघितले असता तिथे रुबिका चा मृतदेह 12 च्या वर तुकड्यांमध्ये आढळून आला. Brutal murder
रुबिकाच्या मृतदेहाचे 12 तुकडे पोलिसांना आढळले, परंतु तिच्या मानेसह शरीराच्या वरील भागाचे तुकडे मात्र मिळाले नाही.
रुबिका चा मृतदेह इलेक्ट्रिक कटरने कापलं असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला, पोलिसांनी दिलदार अन्सारी ला अटक केली असून पुढील चौकशी सुरू केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने