महिनाभर त्या युवकांनी मोजल्या रेल्वे गाड्या पगाराचा दिवस आला आणि......

महिनाभर त्या युवकांनी मोजल्या रेल्वे गाड्या पगाराचा दिवस आला आणि......

Crime story's
तामिळनाडू - देशात बेरोजगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आता बेरोजगार वाट्टेल ते काम करीत आहे, मात्र काही जण शासकीय नोकरीच्या नादात फसवणुकीच्या विळख्यात सापडतात. 
असाच एक प्रकार 28 बेरोजगार तरुणांसोबत घडला, राज्यातील विरुधूनगर येथे राहणारे माजी सैनिक सुब्बूसामी हे निवृत्त झाल्यावर आपल्या भागातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करीत होते, त्यासाठी ते तरुणांकडून पैसे घेत नव्हते.
Unemployed youth
सुब्बूसामी जेव्हा दिल्ली मधील एका MP क्वार्टर मध्ये गेले असता त्यांना कोईम्बतूर निवासी शिवरमन नावाचे व्यक्ती भेटले, त्यांची अनेक मंत्र्यासोबत ओळखी असल्याचे त्यांनी सांगितले होते. Fraud of unemployed youth
कुणाला नोकरी हवी असेल तर काही पैसे घेऊन रेल्वे विभागात नोकरी देण्याचे प्रयत्न आपण करू असे शिवरमन ने सुब्बूसामी ला सांगत विश्वासात घेतले.
सुब्बूसामी त्याच्या बोलण्यावरून फसले आणि 3 तरुणांना सोबत घेत दिल्ली गाठली, काही दिवसांनी पुन्हा 25 तरुण दिल्ली पोहचले, प्रत्येक उमेदवाराने सुब्बूसामी यांना प्रत्येकी 2 ते 24 लाख असे एकूण 2.67 कोटी रुपये दिले.
ते सर्व पैसे विकास राणा नामक व्यक्तीला देण्यात आले, राणा यांनी स्वतःला उत्तर रेल्वे कार्यालयात उपसंचालक असल्याचे भासविले होते.
जून ते जुलै दरम्यान सर्व 28 तरुणांचे प्रशिक्षण सुद्धा पूर्ण झाले, सदर 28 तरुणांना विविध रेल्वे स्टेशनवर दररोज 8 तास रेल्वे गाड्या व डब्बे मोजण्याचे काम देण्यात आले होते.
तिकीट परीक्षक, वाहतूक सहायक आणि क्लर्क या पदासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, महिना भर असेच सुरू होते मात्र महिना झाल्यावर त्यांना मोबदला मिळाला नाही त्यावेळी त्यांनी रेल्वे विभाग गाठत विचारणा केली असता त्या 28 तरुणांची फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. India crime news
78 वर्षीय सुब्बूसामी यांनी दिल्ली गाठत याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली, आपण सर्व तरुणांची त्या बनावट अधिकाऱ्यांशी मैत्री करून दिली, मला याबाबत काही कल्पना नव्हती या प्रकरणी माझी सुद्धा फसवणूक झाली असल्याचे सुब्बूसामी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
फसवणूक झालेले सर्व बेरोजगार तरुण हे इंजिनिअरिंग पदवीधारक आहे. Railway employment scam
सध्या आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे, रेल्वे मंत्रालयाने बेरोजगार तरुणांना सावध केले असून याबाबत कुणीही रेल्वे विभागात नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने