भाजप आमदाराच्या घरी चोरी

भाजप आमदाराच्या घरी चोरी

Crime story's
हिंगोली - नागपूर अधिवेशनाचा आज पहिला दिवस असताना सकाळी 6 वाजताच्या सुमारास भाजप आमदाराच्या घरी चोरी झाली असल्याची बाब उघडकीस आली. Maharashtra crime news
Bjp mla house
भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या तालुक्यातील आडगाव मुटकूळे येथील चोरट्यानी चार घरी डल्ला मारला मात्र त्यांच्या हाती काही न लागल्याने एकाच्या 2 शेळ्या त्यांनी पळवून नेल्या.
19 डिसेंम्बरला सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली, हिंगोली मतदार संघातील भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आडगाव मुटकुळे गावात नवे घर बांधले होते, मात्र त्यांचे कुटुंबीय अजूनही जुन्या घरात राहत होते, 18 डिसेंम्बरच्या रात्री अज्ञात चोरट्यानी गावात प्रवेश करीत आमदाराच्या घराचे कुलूप तोडले, आमदाराच्या घरात काही सापडतेय का? यावर अनेक वेळ शोधाशोध सुद्धा झाली मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही.
त्यानंतर चोरट्यानी पुन्हा तिघांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला, तिथेही त्यांना काही न आढळल्याने खोरणे यांच्या शेतात असलेले शेळ्यांची 2 पिल्ले चोरून नेली.
याबाबत पोलिसात तक्रार व आमदाराच्या घराचे कुलूप तोडल्याची बाब पोलिसांना माहिती पडताच, वरिष्ठ अधिकारी यांचा फौजफाटा गावात पोहचला.
पोलीस कर्मचाऱ्यानी पंचनामा करीत पुढील तपास करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने