घरात घुसून डॉक्टर तरुणीचे अपहरण

घरात घुसून डॉक्टर तरुणीचे अपहरण

Crime story's
तेलंगणा - राज्यातील रंगा रेड्डी जिल्ह्यात हादरविणारी घटना पुढे आली आहे, तब्बल 100 युवकांनी डॉक्टर तरुणीच्या घरासमोर धुडगूस घालत तिचे अपहरण केले.
घराबाहेर असलेल्या वाहनांची त्या युवकांनी तोडफोड केली, इतकेच नव्हे तर डॉक्टर तरुणीच्या वडिलांना त्या युवकांनी बेदम मारहाण सुद्धा केली, याबाबत चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Telangana crime
24 वर्षीय डॉक्टर तरुणीचे नाव वैशाली असून तिचा साखरपुडा ठरला होता, मात्र शुक्रवारी हा प्रकार घडल्याने रंगा रेड्डी जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. India crime news
पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार केली असून सीसीटीव्ही च्या माध्यमातून आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
डॉक्टर तरुणीच्या कुटुंबांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 100 युवकांनी घराबाहेर धुडगूस घातला, वाहनांची तोडफोड केली, त्यांनतर घरात प्रवेश करीत तिथेही तोडफोड करण्यात आली, मुलीला जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले, ओढत नेत तिला कार मध्ये बसवून नेले, या कृत्याचा मुलीच्या वडिलांनी विरोध केला असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. Kidnapping
पोलीस सध्या आरोपीच्या शोधात असून लवकर त्यांना अटक करून मुलीला सुखरूप घरी परत आणू अशी प्रतिक्रिया अतिरिक्त पोलीस आयुक्त सुधीर बाबू यांनी दिली आहे.

Mmmm
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने