अबब चंद्रपूरातून ट्रक गेले चोरीला

अबब चंद्रपूरातून ट्रक गेले चोरीला

Crime story's
चंद्रपूर - आजपर्यंत आपण दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहन चोर बघितले असतील पण चंद्रपुरात ट्रक चोरीचे प्रकरण उघडकीस आले आहे. 
21 डिसेंम्बरला लखमापुर येथील महाराणी काटा येथे चालक इम्रान अली अनवर अली शेख यांनी ट्रक क्रमांक MH34AB7114 उभा करून घरी आराम करण्यासाठी निघून गेले होते. Chandrapur crime
दुसऱ्या दिवशी 22 डिसेंम्बरला वाहनचालक लखमापुर येथे गेले असता त्याठिकाणी ट्रक दिसून आला नाही, इम्रान अली यांनी परिसरात ट्रक चा शोध घेतला मात्र ट्रक कुठेही आढळून आला नाही.
23 डिसेंम्बरला इम्रान अली यांनी याबाबत रामनगर पोलीस स्टेशनला ट्रक चोरीची तक्रार दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे अन्वेषण शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे यांनी तपास सुरू केला असता घटनेच्या दिवशी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले असता 2 संशयित आरोपींची ओळख त्यामाध्यमातून पोलिसांना पटली. Maharashtra crime news
गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातील काटोल येथून चोरी गेलेला ट्रक जप्त करीत 2 आरोपीना ताब्यात घेतले.
यामध्ये 24 वर्षीय अलकेश वारू उईके व 34 वर्षीय निलेश संतोष बिहारे दोघेही राहणार मध्यप्रदेश यांना अटक करीत कसून चौकशी केली असता त्यांनी 10 दिवसांपूर्वी सैनिक पेट्रोल पंप समोरून ट्रक क्रमांक MH34M8628 चोरी केला असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी दोन्ही आरोपिकडून ट्रक सहित तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शोध पथकाचे प्रमुख सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले, पोउपनी महेश सामलवार, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, किशोर वैरागडे, विनोद यादव, मिलिंद दोडके, निलेश मुडे, सतीश अवथरे, लालू यादव, संदीप कामडी, विकास जाधव, विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, संदीप कामडी, विकास जाधव व भावना रामटेके यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने