प्रियकराने लग्नाला दिला नकार, प्रेयसी ने उचलले भयावह पाऊल

प्रियकराने लग्नाला दिला नकार, प्रेयसी ने उचलले भयावह पाऊल

Crime story's
पानिपत - मैत्री व प्रेमसंबंध जुळण्याचे नवं ठिकाण म्हणजे समाजमाध्यम, आधुनिक युगातील ऑनलाइन युगात जुळलेले प्रेमसंबंध हे कायमचे टिकले असे एकही उदाहरण सध्या तरी नाही मात्र त्यानंतर घडणारे प्रकार हे भयानक असतात.
असाच एक प्रकार पानिपत येथे घडला आहे, दिल्लीतील एका मुलीची इन्स्टाग्राम वरून पानिपत च्या मुलांसोबत ओळखी झाली, त्यानंतर मैत्री व नंतर प्रेम संबंध दोघात जुळले. India crime news
विशु त्यानंतर त्या युवतीच्या घरी येऊ लागला, दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचे मन बनविले.
लग्नाचे आमिष देत विशु नामक युवकाने अनेकदा त्या युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, पण जेव्हा लग्न करण्याची वेळ आली त्यांनतर त्या युवकाने सरळ शब्दात त्या युवतीला नकार दिला.
युवतीने न खचता विशुला फोनवर लग्नसंदर्भात विचारणा करू लागली पण विशु लग्नाला नकार देत होता. Love affair
अखेर त्या युवतीने दिल्ली वरून थेट पानिपत ला पोहचली, त्यानंतर शहर पोलीस स्टेशनमध्ये जात सदर प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देत गोंधळ घातला, पोलिसांनी त्यानंतर विशु व त्याच्या आईला पोलीस स्टेशनमध्ये बोलाविले.
युवतीने प्रियकरासोबत लग्न करण्याचा हट्ट केला मात्र विशु व त्याची आई लग्नाला नकार देत होती, वारंवार नकार दिल्याने युवतीने धारदार शस्त्राने स्वतःच्या हाताची नस कापली.
पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी युवतीचा तात्काळ रुग्णालयात दाखल केले, विशु ने जर माझ्याशी लग्न केले नाही तर मी आत्महत्या करेल असा इशारा त्या युवतीने दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने