दुर्गापुरात सुरू असलेल्या सट्टापट्टीवर स्थानिक गुन्हे शाखेची धाड

दुर्गापुरात सुरू असलेल्या सट्टापट्टीवर स्थानिक गुन्हे शाखेची धाड

Crime story's
चंद्रपूर - दुर्गापूर क्षेत्रात मागील अनेक दिवसांपासून अवैध धंद्याने जोर पकडला आहे, सट्टा पट्टी, जुगार असे अनेक धंदे छुप्या पध्द्तीने दुर्गापूर क्षेत्रात सुरू आहे.

दुर्गापुरातील कोंडी वार्ड येथे एक इसम अवैध सट्टा पट्टी च्या कामात गुंतला असल्याची गोपनीय माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. Kalyan matka
माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने कोंडी वार्ड क्रमांक 5 येथे धाड मारली असता आरोपी 64 वर्षीय विलास उरकुडा मेश्राम याला ताब्यात घेण्यात आले. Chandrapur crime
आरोपी मेश्राम हा घरापुढे कल्याण सट्टा घेत होता. त्याच्याजवळ सट्टा आकडे लिहल्याची चिठ्ठी, लोकांकडून स्वीकारलेली रक्कम, मोबाईल व एक दुचाकी असा एकूण 73 हजार 805 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Maharashtra crime news
दुर्गापूर क्षेत्रात 2 महिन्यात हत्येच्या घटना घडल्या होत्या, त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा दुर्गापूर क्षेत्रातील संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवून आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि जितेंद्र बोबडे, संजय आतकुलवार व प्रांजल पंधरे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने