चंद्रपुरातील अख्ख कुटूंबच निघालं तंबाखू तस्कर

चंद्रपुरातील अख्ख कुटूंबच निघालं तंबाखू तस्कर

Crime story's
चंद्रपूर - मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूची तस्करी जोमात सुरू आहे, 10 वर्षांपासून ही तस्करी सतत सुरू आहे.
अनेक तंबाखू तस्कर या कामात गुंतले आहे मात्र चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील आंबटकर कुटूंबच तंबाखू तस्करी मध्ये अग्रेसर झाले आहे.
13 डिसेंम्बरला बाबूपेठ येथील हनुमान आंबटकर या तंबाखू तस्करावर शहर पोलिसांनी धाड मारत 1 लाख 14 हजार 372 रुपयांचा माल जप्त केला.
या प्रकरणी हनुमान आंबटकर व त्याची पत्नी मेघा हनुमान आंबटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. Aromatic Tobacco Smugglers
हनुमान आंबटकर हा सध्या फरार असून त्याची पत्नी पोलिसांच्या ताब्यात आहे, या कारवाईला 2 दिवस उलटल्यावर पुन्हा पोलिसांनी हनुमान आंबटकर यांच्या दुकानावर पुन्हा धाड मारली असता सुगंधित तंबाखू शिशा असा एकूण 17 हजार 110 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Chandrapur police
याप्रकरणात 32 वर्षीय संजू श्रीकृष्ण आंबटकर व त्याची पत्नी रुपाली संजू आंबटकर यांचेवर अन्न व सुरक्षा अधिनियम नुसार कारवाई करण्यात आली.
संजू आंबटकर हा पसार असून त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Chandrapur crime news
बाबूपेठ येथील आंबटकर कुटुंबातील भाऊ व त्यांच्या पत्नी या अवैध व्यवसायात गुंतले असून त्यांच्या या अवैध व्यवसायामुळे अनेक तरुण कॅन्सर च्या विळख्यात सापडलेले आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि मंगेश भोंगाडे, पोलीस कर्मचारी शरीफ शेख, महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, जयंता चुनारकर, चेतन गज्जलवार, सचिन बोरकर, इम्रान खान, इर्शाद खान, रुपेश रणदिवे, सपना साखरे यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने