अनेक गुन्ह्यात पसार असलेला आरोपी चंद्रपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला

अनेक गुन्ह्यात पसार असलेला आरोपी चंद्रपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Crime story's
चंद्रपूर - सिंदेवाही व गडचिरोली जिल्ह्यात दुचाकी चोरी व घरफोडी प्रकरणात पसार असलेला आरोपी चंद्रपूर शहर पोलिसांच्या तावडीत सापडला.
8 डिसेंम्बरला चंद्रपूर गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की अनेक गुन्ह्यात फरार असलेला आरोपी चंद्रपुर शहरातील भिवापूर वार्डात संशयास्पद फिरत आहे, शहर पोलिसांनी 26 वर्षीय शुभम प्रल्हाद शेंडे, रा. चामोर्शी रोड एरिया गडचिरोली याला ताब्यात घेतले. Chandrapur city police
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या जवळ असलेले दुचाकी हिरो पॅशन वाहन क्रमांक MH29AJ2087 बाबत विचारणा केली असता ते वाहन वणी येथून चोरी केली असल्याची कबुली शुभम ने दिली. Chandrapur crime
पोलिसांच्या रात्र गस्तीमुळे अनेक गुन्ह्यात पसार असलेला अट्टल आरोपी गुन्हे शोध पथकाच्या जाळ्यात अडकला. Maharashtra crime news
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार व पोलीस निरीक्षक सुधाकर आंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील कर्मचारी शरीफ शेख, महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, जयंत चुनारकर, चेतन गज्जलवार, सचिन बोरकर, रुपेश रणदिवे, दिलीप कुसराम, इम्रान खान व इर्शाद खान यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने