ऐशो आरामात जगण्यासाठी लाखोंचा दरोडा

ऐशो आरामात जगण्यासाठी लाखोंचा दरोडा

Crime story's
पालघर - प्रियकरासोबत मौजमजा व ऐशोआरामात राहण्यासाठी प्रेयसी ने मिळून तब्बल 9 लाख रुपयांची चोरी केली. Maharashtra crime news

रश्मीगार्डन, एव्हर शाईन सिटी येथे राहणाऱ्या दिव्या पटेल यांच्या घरी अज्ञाताने प्रवेश करीत लाखो रुपये लंपास केले, सदर चोरी कुणी केली याबाबत मात्र काही सुगावा लागला नाही. Robbery
या प्रकरणाची पोलिसात तक्रार झाली, सहायक फौजदार राकेश कालपुंड यांनी पटेल यांच्या घरी कोण-कोण आले याबाबत माहिती घेऊ लागले, पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत विचारपूस केली.
मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, त्या मुलांकडे काही दिवसांपासून महागडा आयफोन, फ्रीज, केटीएम दुचाकी, महागडे फर्निचर अश्या विविध वस्तू आढळल्या, त्याला विश्वासात घेत विचारले असता त्याची प्रियकर व त्याने संगनमत करीत पटेल यांच्या घरी चोरी केली असल्याची कबुली दिली.
अल्पवयीन प्रियकर व त्याच्या प्रेयसीने खान्या पिण्यावर तब्बल दीड लाख रुपये खर्च केले.
विशेष म्हणजे त्याच्या प्रेयसीने ही चोरी आईच्या मैत्रिणीकडे केली होती, सदर चोरी ही फक्त ऐशो आरामात जगण्यासाठी केली असल्याची कबुली अल्पवयीन प्रियकराने दिली.
पोलिसांनी दोघांकडून तब्बल 7 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने