चंद्रपूर रामनगर पोलिसांची मोठी कारवाई

चंद्रपूर रामनगर पोलिसांची मोठी कारवाई

Crime story's
चंद्रपूर - टोल कंपनीत कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी AVRCL कंपनीने चारचाकी वाहनाचा उपयोग करीत होती, मात्र सदर वाहन चोरीला गेलं असता हे प्रकरण पोलिसात गेलं आणि त्यानंतर तपासाला सुरुवात झाली. Chandrapur crime

चंद्रपूर रामनगर पोलीस तब्बल 10 दिवस वाहन चोरी प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध जिल्ह्यात फिरत होती त्यानंतर पोलिसांना या प्रकरणी यश मिळाले.
21 नोव्हेंम्बरला AVRCL कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक CG04MA6755 नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी व त्यानंतर परत सोडण्यासाठी गेले. Maharashtra crime news
त्यांनतर वाहन चालक 42 वर्षीय अशोक बोराळे यांनी ते वाहन घरी पार्क केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बोराळे हे पुन्हा कर्तव्यावर जाण्यासाठी वाहन बघितले असता त्याठिकाणी ते वाहन नव्हते. Chandrapur police
बोराळे यांनी वाहनाचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते कुठे मिळाले नसल्याने बोराळे यांनी याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये वाहन चोरीची फिर्याद नोंदविली.
चारचाकी वाहन चोरीचे प्रमाण बघता सदर प्रकरणाचा उलगडा लवकर व्हावा यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार व पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाला योग्य ते निर्देश दिले.
गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनी विनोद भुरले, पोउपनी मधुकर सामलवार व पथक रवाना झाले. Cyber cell chandrapur
आव्हानात्मक गुन्हा असल्याने गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी पोहचत सर्व बाबीची तपासणी केली, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील CDR याची माहिती सायबर सेल कडून प्राप्त करण्यात आली. Interstate Gang
सतत 10 दिवस यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात पोहचत आरोपी 50 वर्षीय रियाज खान सरफराज खान, 21 वर्षीय जुबेर जकीर खां पठाण, 32 वर्षीय शेख सोनू शेख साबीर ला ताब्यात घेण्यात आले, आरोपीची अधिक चौकशी केली असता ऑक्टोबर 2022 पासून अमरावती, यवतमाळ व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील चारचाकी वाहने चोरी करीत त्याला गॅस कटरच्या सहाय्याने कापत भंगारात विक्री करण्याचे काम आरोपी प्रफुल गांगेकर उर्फ बबलू पठाण उर्फ तिसमार खान च्या मार्फत करत असल्याची कबुली रियाज ने दिली.
आरोपी हे यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या प्रफुल गांगेकर हा फरार आहे.
रामनगर पोलिसांनी आरोपिकडून 3 चारचाकी वाहन सहित 5 लाख 61 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार व पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले, पोउपनी मधुकर सामलवार, किशोर वैरागडे, प्रशांत शेंदरे, रजनीकांत पुठ्ठावार, दशरथ शेडमाके, सतीश अवथरे, संदीप कामडी, विकास जाधव, हिरालाल गुप्ता, निलेश मुडे, मिलिंद दोडके, भावना रामटेके, प्रशांत लारोकर, छगन जांभूळे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने