पतीच्या मृतदेहाला पत्नीने मारल्या लाता

पतीच्या मृतदेहाला पत्नीने मारल्या लाता



Crime story's
दिल्ली - अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढल्याची घटना उघडकीस आली आहे. Brutal murder
40 वर्षीय सुरेशला रविवारी बेशुद्ध अवस्थेत लाल बहादूर शास्त्री येथे नेण्यात आले होते, मात्र रुग्णालयात येण्यापूर्वी सुरेश चा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी सुरेश च्या मृत्यूची नोंद करीत मृतदेहाचे शवविच्छेदन करीत मृतकाचा भाऊ व पत्नीचे बयान नोंदविले, त्यावेळी कुटुंबातील एकानेही सुरेश च्या मृत्यूवर आक्षेप घेतला नाही. Delhi crime
7 डिसेंम्बर नंतर शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह कुटुंबियांना देण्यात आला, शवविच्छेदन चा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी पोलिसांना सांगितल्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.
सुरेश च्या पोटावर, डोकं, मान व छातीवर अंतर्गत जखमा व गळा आवळून खून केला असल्याची माहिती पोलिसांना डॉक्टरांनी दिली. India crime news
पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत पथक तयार केले व याबाबत तपास सुरू केला, पोलिसांनी पत्नी, मुले व शेजारी यांची याबाबत विचारपूस केली असता पोलिसांना याबाबत काही सुगावा लागला नाही.
पोलिसांनी पुन्हा याबाबत दीर्घ चौकशी केली असता मृतकाची पत्नी हेमा च्या बयानात विरोधाभास आढळून आला.
एका शेजाऱ्याने तपासात मृतकाची पत्नी व तिच्या प्रियकरावर संशय व्यक्त केला. Immoral relationship
पोलिसांनी हेमा व तिचा प्रियकर सचिन यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी सुरेश चा गळा आवळून खून केला असल्याची कबुली दिली.
घटनेच्या दिवशी सुरेश ला पत्नी व तिच्या प्रियकराने दारू पाजली, दारूची नशा चढल्यावर पत्नी व प्रियकराने सुरेश चा पडद्याच्या साहाय्याने गळा आवळला, सुरेश मरण पावला नसेल म्हणून त्याच्या मृतदेहावर लाथा व बुक्क्यांनी मारहाण केली.
हेमा व सचिन यांना सोबत रहायचे होते, मात्र त्यांच्या या अनैतिक संबंधात पती सुरेश अडसर होता म्हणून त्याचा खून केल्याची बाब हेमा व सचिन ने कबूल केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने