मुलगा म्हणाला, आई दुकानात जातो, पण तो परतलाचं नाही

मुलगा म्हणाला, आई दुकानात जातो, पण तो परतलाचं नाही

Crime storys
जळगाव - मंगळवारी 6 डिसेंम्बरला कांतीलाल पवार हा युवक आपल्या आईसोबत महाबळ येथून येत होता, घरी परतल्यावर त्याने आईला दुकानात जातो असे सांगितले मात्र तो परत आलाच नाही. Jalgav suicide
महाबळ परिसरातील त्र्यंबक नगरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून त्याने उडी मारत आत्महत्या केली.
कांतीलाल पवार हा आपल्याया आई, पत्नी व 3 वर्षाच्या मुलासह समता नगर परिसरात वास्तव्यास होता, कांती हा हातमजुरी करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता, मात्र त्याच्या सोबत असे काय झाले की त्याने आत्महत्या केली याबाबत काही कारण स्पष्ट झाले नाही. Maharashtra crime news
तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्यावर कांतीलाल चा जागीच मृत्यू झाला, त्याच्या मृत्यूची बातमी आई ला कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. India crime
एकुलता एक भाऊ गेल्याने कांती च्या बहिणीने रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला, याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी अकस्मात गुन्ह्याची नोंद करीत तपास सुरू केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने