दुचाकी वाहनचोरांवर चंद्रपूर पोलीस भारी

दुचाकी वाहनचोरांवर चंद्रपूर पोलीस भारी

Crime story's
चंद्रपूर - शहरातील सरदार पटेल महाविद्यालय परिसरात 12 डिसेंम्बरला सकाळी 8 वाजता दुचाकी वाहन चोरीची फिर्याद जलनगर येथे राहणारे 21 वर्षीय विशाल किशोर मंचलवार यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली.
दुचाकी वाहन क्रमांक mh34 aw9257 च्या शोधात शहर पोलिसांनी खबरी नेटवर्क ऍक्टिव्ह केला. Chandrapur crime
व अवघ्या काही तासात सदर दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावला.
23 वर्षीय मोहमद रियाज शफीक शेख राहणार नुरी चौक बगड खिडकी याला ताब्यात घेतले, मोहम्मद रियाज ची कसून चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली. Maharashtra crime news
मोहम्मद रियाज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडून पुन्हा एक दुचाकी असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार व पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील प्रमुख सपोनि मंगेश भोंगाडे, पोलीस कर्मचारी शरीफ शेख, महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, जयंत चुनारकर, सचिन बोरकर, चेतन गज्जलवार, रुपेश रणदिवे, इम्रान खान, इर्शाद शेख, दिलीप कुसराम यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने