IPS अधिकाऱ्याने केली डॉक्टर महिलेची फसवणूक

IPS अधिकाऱ्याने केली डॉक्टर महिलेची फसवणूक

Crime story's
दिल्ली - जगाला वेड लावणाऱ्या सोशल मीडियाने समाजात वेगळीच प्रतिमा तयार केली आहे, सोशल मीडियात अनेकांचे प्रोफाईल्स आज सर्व बघू शकतात, विविध सुविचार, क्लिप्स च्या माध्यमातून आपले फॉलोवर्स सुद्धा वाढविण्यासाठी नागरिक विचित्र प्रकार करीत असतात. Delhi crime
मात्र एकाने तर सोशल मीडियात प्रोफाइल बनवीत अनेकांना फसविले, मात्र डॉक्टर महिलेच्या तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली. Fake ips officer
विकास गौतम नामक इसमाचं शिक्षण आठवीपर्यंत झाले होते, मध्यप्रदेश मधील ग्वालीयर मध्ये राहणाऱ्या विकास ने अनेक महिलांना फसविले.
विकास ने आयटीआय मधून वेल्डिंग चे प्रशिक्षण सुद्धा घेतले होते मात्र त्याच्या डोक्यात वेगळीच कल्पना आली आणि त्याने फेसबुक व इन्स्टाग्राम वर आयडी बनवली, त्यामध्ये त्याने 2021 बॅच मधील IPS अधिकारी असल्याची माहिती दिली.
दिल्लीत शिफ्ट झाल्यावर विकास एका हॉटेलमध्ये काम करायचा, मात्र तो स्वतःला कानपुर आयआयटी मधून पास झाला असा सर्वाना भासवीत होता.
Fake profile च्या माध्यमातून तो महिलांसोबत जवळीक साधत त्यांच्या विश्वास जिंकत पैसे लाटायचा, आरोपी गौतम विरोधात उत्तरप्रदेश व ग्वालीयर मध्ये अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल होते.
दिल्लीच्या संजय गांधी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर महिलेशी विकास ने ओळखी करीत तिला विश्वासात घेतले, स्वतः IPS अधिकारी असल्याचे त्या डॉक्टर महिलेला भासविले, व 25 हजार रुपये सुद्धा घेतले, मात्र त्यानंतर डॉक्टर महिलेने याबाबत पोलिसात तक्रार केली. India crime news
दिल्लीच्या सायबर पोलिसांनी बोगस आयपीएस अधिकाऱ्यांची फेक प्रोफाइल बघत त्याचा पत्ता काढला व विकास ला अटक केली, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या विकास च्या डोक्यात या गुन्हेगारीबाबत अशी कल्पना आली कशी यावर आता दिल्ली पोलीस तपास करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने