चंद्रपूर शहरात पती-पत्नी करीत होते गांजाविक्री

चंद्रपूर शहरात पती-पत्नी करीत होते गांजाविक्री

Crime story's
चंद्रपूर - चंद्रपूर आता उडता चंद्रपूरच्या मार्गावर असून सध्या अंमली पदार्थाची विक्री शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्यांवर धाड मारीत तब्बल पावणे दोन किलो गांजा जप्त केला. Chandrapur crime
Narcotics
पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या सूचनेनुसार सध्या चंद्रपूर पोलीस ऍक्शन मोड मध्ये आहे, जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंद्यावर ऑपरेशन क्लिन मार्फत कारवाई करणे सुरू आहे. Maharashtra crime news
चंद्रपूर शहरातील बिनबा गेट परिसरात राहणारे संजय डोंगरे यांनी गांजा विक्री साठी आणला असून तो गांजा त्यांची पत्नी दुर्गा डोंगरे घरूनचं छुप्या पध्द्तीने गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीच्या आधारे चंद्रपूर शहर गुन्हे अन्वेषण पथकाने डोंगरे यांच्या घरी धाड मारली असता त्याठिकाणी 1.755 किलोग्राम गांजा किंमत 34 हजार, रोख 6 हजार 590 रुपये 1 मोबाईल किंमत 10 हजार रुपये असा एकूण 50 हजार 590 रुपयांचा माल जप्त करीत संजय डोंगरे व दुर्गा डोंगरे यांना अटक करण्यात आली.
चंद्रपूर शहर पोलिसांनी मादक पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
विशेष म्हणजे या गांजा ची विक्री केल्यावर ग्राहकाकडून Google pay व Phone pay मार्फत पैसे घेत आधुनिक पद्धतीने गांजा विक्री करीत होते.
विशेष म्हणजे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सदर कारवाई करण्यात आल्याने गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या नेतृत्वात सपोनि मंगेश भोंगाडे, पोउपनी संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी शरीफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, जयंता चुनारकर, चेतन गजजलवार, सचिन बोरकर, दीपक गुरनुले, पूनम अलाम, इम्रान खान, रुपेश रणदिवे, इर्शाद खान, दिलीप कुसराम यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने