अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Crime story's
मुंबई - राज्यात महिला व मुलींच्या अत्याचाराबाबत होणाऱ्या घटनेत सतत वाढ होताना दिसत आहे, अश्यातच मुंबई मधून हादरविणारी घटना पुढे आली आहे. gang rape in mumbai

15 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या मित्राने दुसऱ्या एका मित्राच्या घरी बोलाविले, मात्र तिथे गेल्यावर अल्पवयीन मुलीवर तब्बल 6 जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला.
सदर संतापजनक घटना मुंबई येथील लोअर परेल भागात घडली, या घटनेबाबत घाबरलेल्या मुलीने कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला.
त्यानंतर तात्काळ कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तात्काळ चौकशी करीत अवघ्या काही तासात 6 जणांना बेड्या ठोकल्या यामध्ये 3 आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले असून उर्वरित 3 आरोपीना न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 डिसेंम्बर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर प्रकरणी अजून काही पुरावे मिळण्याची शक्यता असल्याने पोलीस पुढील तपास करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने