17 हजारांची लाच घेताना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला रंगेहात अटक

17 हजारांची लाच घेताना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला रंगेहात अटक

Crime story's
नाशिक - लाच मागणे व देणे हा गुन्हा असला तरी असे अनेक गुन्हे आज घडत आहे, काम करायचं असल्यास लाच द्यावीच लागले, फाईल पुढे सरकविण्यासाठी पैसे द्यावेच लागतात, अशी मनस्थिती अधिकारी व नागरिकांची बनलेली आहे, मात्र काही सजग नागरिक यांच्याविरोधात बंड करतात.

Bribery
वीज मीटर व ट्रान्सफर बसविणे या कामास मंजुरी देण्याच्या मोबदल्यात महावितरण च्या ठेकेदाराला अतिरीक्त कार्यकारी अभियंता संजय ढालपेने यांनी लाच मागितली. Acb trap
पैसे देण्याची इच्छा नसल्याने ठेकेदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली, तक्रारीची पडताळणी केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत महावितरणच्या अधिकाऱ्याला 17 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली, अभियंता सोबत त्याच्या सहकाऱ्याला सुद्धा लाच घेताना अटक केली. Maharashtra crime news
नाशिक लाचलुचपत विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. India crime
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने विद्युत विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने