नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला बेदम मारहाण

नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला बेदम मारहाण

Crime story's
औरंगाबाद - गंगापूर तालुक्यातील ओझर मध्ये नातवाने मुलगी पळविल्याच्या रागातून आजीला नग्न करीत बेदम मारहाण करण्यात आली. 

हा संतापजनक प्रकार घटनेच्या 2 दिवसांनी उघडकीस आला. Aurangabad crime
पीडित महिला ही गंगापूर फाट्याजवळ राहते, 1 डिसेंम्बरला महिलेच्या नातवाने आरोपी च्या मुलीला पळवून नेले होते, मुलीच्या शोधात आरोपी गंगापूर फाट्याजवळ आला.
त्यावेळी आरोपी सोबत दोघेजण होते, आरोपीनी आधी महिलेला विचारपूस केली मात्र नातू कुठे गेला याबाबत मला काही माहिती नाही असे उत्तर त्यांना दिले. Maharashtra crime news
महिलेच्या उत्तराला संतापून आरोपीनी त्या वृद्ध महिलेला मारहाण केली, आरोपी इतक्यावर थांबले नाही त्यांनी त्यानंतर महिलेला नग्न करीत बेदम मारहाण केली, याचा व्हिडीओ आरोपीनी बनविला व तो समाजमाध्यमात व्हायरल केला. India crime
बेदम मारहाणीत ती महिला बेशुद्ध पडली, नागरिकांनी तात्काळ त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले, 2 दिवसानंतर त्या महिलेने याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
या प्रकरणात पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून तिघांचा शोध सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने