बाबूपेठ येथील सुगंधित तंबाखू माफियावर शहर पोलिसांची धाड

बाबूपेठ येथील सुगंधित तंबाखू माफियावर शहर पोलिसांची धाड

Crime story's
चंद्रपूर - जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून प्रतिबंधित अवैध सुगंधित तंबाखू विक्रीचा धंदा सुरू आहे, या अवैध धंद्याने अनेक तरुणांना कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराच्या विळख्यात टाकले आहे. Gutkha

चंद्रपूर शहरातील अवैध सुगंधित तंबाखू विक्रीवर आळा घालण्यासाठी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने बाबूपेठ येथील सुगंधित तंबाखू माफिया हनुमान यांच्या दुकानावर धाड मारली.
34 वर्षीय हनुमान आंबटकर हा अनेक वर्षांपासून सुगंधित तंबाखू विक्रीचा व्यवसाय करतो, बाबूपेठ भागात अनेक लहान हनुमान हा लहान व्यवसायिकांना सुगंधित तंबाखू विक्री करण्याचे काम करतो.vimal pan masala
शहर पोलीस यांच्या सतर्कतेमुळे हनुमान आंबटकर यांच्या दुकानात धाड मारत पान मसाला विमल, सुगंधित तंबाखू शिशा टोबॅको पॉकेट असा एकूण 1 लाख 14 हजार 372 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Illicit flavored tobacco
पोलिसांनी 34 वर्षीय हनुमान आंबटकर व त्याची पत्नी मेघा हनुमान आंबटकर यांचेवर अन्न व सुरक्षा अधिनियम नुसार कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनात शरीफ शेख, महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, जयंत चुनारकर, चेतन गज्जलवार, सचिन बोरकर, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद खान, रुपेश रणदिवे, महिला नायक शिपाई सपना साखरे यांनी केली. Maharashtra crime

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने