धक्कादायक चंद्रपुरात 2 महिन्याच्या बाळाची विक्री

धक्कादायक चंद्रपुरात 2 महिन्याच्या बाळाची विक्री

Crime story's
बल्लारपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील रेल्वे स्थानकात नवजात बालकाची तस्करी केल्याप्रकरणी 2 आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
Child trafficking
25 डिसेंम्बरला रेल्वे नंबर 12655 नवजीवन एक्स्प्रेस च्या कोच क्रमांक S/6 मध्ये एक दाम्पत्य नवजात बालकाला सोबत घेत प्रवास करीत होते, सदर दाम्पत्य हे विजयवाडा येथे जात होते.
याबाबत रेल्वेला तक्रार प्राप्त झाली होती की सदर दाम्पत्य हे नवजात बालकाची विक्री करणार आहे.
याबाबत नागपूर रेल्वेने तात्काळ चंद्रपूर रेल्वे पोलिसांना दिली. Ballarpur railway station
रेल्वे पोलीस सहित मानव तस्करी विभागाचे प्रवीण महाजन, संजय शर्मा, सिंह, रेल्वे पोलीस राठोड हे बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पोहचत कोच क्रमांक S/6 चौकशी केली मात्र त्या कोच मध्ये तसे कुणी आढळले नाही, मात्र कोच क्रमांक S/3 मध्ये माहिती मिळल्याप्रमाणे एक दाम्पत्य प्रवास करीत होते. Chandrapur crime
पोलिसांनी आधी चौकशी केली असता त्यांनी स्वतःला पती-पत्नी असल्याचे सांगितले मात्र त्यांच्यासोबत असलेले 2 महिन्याचे नवजात बाळ हे सतत रडत असल्याने पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. Child line
पोलिसांनी कसून चौकशी करीत त्यांचा मोबाईल तपासून बघितला असता त्यामध्ये मुलाला विजयवाडा येथे विक्री करणार असल्याचे स्पष्ट झाले. Maharashtra crime news
दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यांनी नवजात बाळाला विक्री करणार असल्याचे कबूल केले, बल्लारपूर रेल्वे पोलिसांनी दोघांना रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये आणले.
रेल्वे पोलिसांनी सदर प्रकरणी चंद्रकांत मोहन पटेल, वय- 40, वर्ष पता- इंदिरानगर संगम सोसायटी राणी सती मार्ग मलाड ईस्ट मुंबई, द्रौपदी राजा मेश्राम, उम्र- 40 वर्ष, पत्ता-IBM रोड, धम्म नगर गिट्टी खदान, काटोल रोड नागपूर या आरोपीना अटक केली.
सदरची कारवाई नागपूर रेल्वे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण गाडवे, ASI गौतम, आरती यादव, मुकेश राठोड यांनी केली.
आरोपींची मेडिकल चाचणी करीत त्यांना बल्लारपूर रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दोन्ही आरोपीनी 10 हजार तथा 5 हजार रुपये घेत बाळाची विक्री ही विजयवाडा येथील युनूस व मुमताज यांच्याकडे करणार होते.
दोन्ही आरोपीवर कलम 370 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने