भर रस्त्यात सैराट ची पुनरावृत्ती

भर रस्त्यात सैराट ची पुनरावृत्ती

Crime story's
औरंगाबाद - ऑनर किलिंग वर प्रदर्शित झालेला सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली, मात्र या चित्रपटाला साजेश्या अश्या क्रूर घटना ही पुढे आल्या. Sairat movie
Honor killing
अशीच एक घटना औरंगाबाद येथे घडली, 3 वर्षांपूर्वी बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून बहिणीच्या पतीची भर रस्त्यात कुऱ्हाडीने वार करीत निर्घृणपणे हत्या केली, त्यानंतर बहिणीच्या नवऱ्याचा मृत्यू झाला की नाही याची खात्री पटल्यावर आरोपीने मृतदेहाजवळ जल्लोष साजरा केला.
30 वर्षीय बापू खिल्लारे असे मृतकाचे नाव आहे, औरंगाबाद-पुणे मार्गावरील दहेगाव बंगळ्याजवळ इसारवाडी फाटा येथे ही क्रूर हत्या घडली, 3 वर्षांपूर्वी चा राग मनात ठेवत आरोपीने बापू वर कुऱ्हाडीने सपासप वार करीत संपविले, त्यानंतर मृतदेहाजवळ जल्लोष साजरा केला, हे सर्व दृश्य त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी बघितले, जल्लोष साजरा केल्यावर आरोपी दुचाकीने घटनस्थळावरून पसार झाला. Maharashtra crime news
आरोपीच्या अटकेसाठी वाळूज पोलिसांनी पथके तयार करीत शोध सुरू केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने