9 वर्षीय बालकाची क्रूर हत्या

9 वर्षीय बालकाची क्रूर हत्या

Crime story's
नाशिक - बेपत्ता असलेल्या 9 वर्षाच्याया बालकाची क्रूर पणे हत्या करण्यात आली.
नाशिक शहरातील नेहरू भवन परिसरात राहणारा 9 वर्षीय लोकेश सोनवणे हा मुलगा बुधवारी सकाळी खेळायला गेला असता तो घरी परतला नाही. Brutal murder
आई-वडिलांनी लोकेश चा सर्वत्र शोध घेतला मात्र त्याचा पत्ता कुठेही लागला नाही, त्यानंतर आई-वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये लोकेश च्या अपहरणाची तक्रार नोंदविली. Nashik crime
अल्पवयीन बालक असल्याने पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी गुरुवारी रेल्वे स्थानकाजवळ झुडपात एकाचा मृतदेह मिळाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सपोनि प्रल्हाद गीते व रेल्वे पोलीस निरीक्षक जोगदंड यांच्यासह आरपीएफ अधिकारी त्या ठिकाणी पोहचले. Maharashtra crime news
सदर मृतदेह 9 वर्षीय लोकेश चा होता, मृतदेह बघून पोलिसांना धक्का बसला, कारण लोकेशचा हात कापत त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती, मृतदेहाजवळ करवत सापडली.
9 वर्षीय बालकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने सोनवणे कुटुंबीय हादरुन गेले.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करीता पाठविला.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता एक तरुण हातात करवत घेऊन जात असल्याने त्या फुटेज मध्ये दिसला असता पोलिसांनी त्याला संशयाच्या आधारे अटक करीत चौकशी सुरू केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने