चंद्रपूर जिल्ह्यात गो तस्करांवर मोठी कारवाई

चंद्रपूर जिल्ह्यात गो तस्करांवर मोठी कारवाई

Crime story's
गडचांदूर/कोठारी - गडचांदूर भागांतील उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यावर कारवाईचा सपाटा सुरू झाला असून, आधी कोल तस्कर, सट्टा पट्टी व जुगार क्लब वर कारवाई केल्यानंतर आता गो तस्करी करणाऱ्या वर मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल 29 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Chandrapur crime

Animal trafficking
पहिल्या कारवाईत गडचांदूर मध्ये 22 डिसेंम्बरला रात्री पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बेलमपूर रोडवर नाकाबंदी करीत आयशर टेम्पो क्रमांक MH27BX5838 मध्ये 7 गोवंश बैल व बोलेरो वाहन क्रमांक MH34BG9726 मध्ये 4 गोवंश बैल असा एकूण 16 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी गडचांदूर पोलिसांनी 48 वर्षीय प्रकाश रामकृष्ण हिवरे, 54 वर्षीय रमेश महादेवराव गजभिये दोन्ही रा. चारगाव बुद्रुक्, वरोरा व 32 वर्षीय इरफान गुफरान खान रा. गडचांदूर यांना अटक करण्यात आली.
ताब्यात घेतलेले गोवंश हे तेलंगाणा राज्यात नेण्यात येणार होते.
दुसऱ्या कारवाईत कोठारी येथे तोहोगाव जवळ गुप्त माहितीच्या आधारे कोठारी पोलिसांनी 35 गोवंश जनावरे सहित 13 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोबत 2 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
सदरची कारवाई सपोनि तुषार चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली. Maharashtra crime news
गडचांदूर गो तस्करीची कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात सपोनि प्रमोद शिंदे, सपोनि गोरक्षनाथ नागलोथ, पोलीस कर्मचारी प्रशांत येडे, महेश चव्हाण, खंडूजी मुंडकर व व्यंकटेश भटलाडे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने