चंद्रपुरात पोक्सो व बलात्कार प्रकरणातील आरोपी महिन्याभरापासून फरार

चंद्रपुरात पोक्सो व बलात्कार प्रकरणातील आरोपी महिन्याभरापासून फरार

Crime story's
चंद्रपूर - अल्पवयीन असताना लग्नाचे आमिष देत वारंवार तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले, मात्र त्या युवकाने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले, त्याला मुलगी झाली असताना सुद्धा त्याने पहिल्या प्रेयसीला बदनामी ची धमकी देत तीच्यावर अत्याचार करू लागला त्या युवकाच्या त्रासाला कंटाळून युवतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
त्या युवकावर पोक्सो व कलम 376 अंतर्गत गुन्हा 3 नोव्हेंम्बरला दाखल करण्यात आला मात्र तो आरोपी युवक अजूनही पसार आहे, या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी आरोपी युवकाने न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला, आता त्या आरोपीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, 14 डिसेंम्बरला जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. Chandrapur crime

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे.
मात्र त्या आरोपी युवकांवर गंभीर व अजामीनपात्र गुन्हे दाखल असताना सुद्धा पोलिसांनी त्याला अटक का केली नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Maharashtra crime news
सदर प्रकरण वर्ष 2016 ला सुरू झाले त्यावेळी पीडित मुलगी ही अवघ्या 16 वर्षाची होती, शाळेत ये जात असताना आरोपिसोबत ओळखी झाली होती.
त्यानंतर दोघांची मैत्री झाली, आरोपी युवकाने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवीत शरीरसंबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर मुलीने अनेकदा लग्नसंदर्भात आरोपी कडे विचारणा केली मात्र तो नेहमी टाळाटाळ करीत होता.
2019 ला आरोपी युवकाने दुसऱ्या मुलीशी लग्नगाठ बांधली, त्याच्या पत्नीला मुलगी झाली, मात्र त्यानंतर सुद्धा आरोपीने पीडित मुलीचा पाठलाग सुरू ठेवत, तिला बदनामीची धमकी देत अत्याचार सुरू ठेवले.
तू दुसऱ्यासोबत लग्न करशील तर मी ते होऊ देणार नाही, जर तू प्रयत्न केला तर मी लग्नात गोंधळ घालणार अशी धमकी आरोपी युवक देऊ लागला, या धमकीमुळे पीडित मुलगी दहशती मध्ये आली होती. Pocso act
आरोपी युवक हा महावितरण मध्ये तंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहे, 13 ऑक्टोबर ला अचानक आरोपी युवक पीडित युवतीच्या रूम वर पोहचला, पीडितेला पुन्हा बदनामी करण्याची धमकी देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, सकाळी पीडितेला मारहाण करीत आरोपी तिथून निघून गेला.
पीडित युवती सदर प्रकारानंतर घाबरून गेली होती, काही दिवस ती मानसिक तणावात गेली असता पीडितेच्या भावाने याबाबत विचारणा केली असता तिने काही सांगितले नाही.
पीडितेच्या भावाने तिचा मोबाईल तपासला असता सर्व प्रकार भावाला लक्षात आलं, त्यांनतर आरोपीला याबाबत विचारणा केली असता युवक पीडितेच्या अंगावर धावून आला.
पीडितेने हिम्मत करीत याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, पोलिसांनी आरोपी युवकावर कलम 323, 363, 376 (2)(n), 376 (3), 417, 506 व पोक्सो कलम 3 व 6 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
मात्र तक्रार दाखल करीत महिना लोटला तरी आरोपी युवकाला पोलिसांनी अटक केली नाही. याबाबत पोलीस निरीक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता सदर प्रकरणात आरोपीने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याने जामीन अर्जावर काय सुनावणी होते याकडे लक्ष लागून आहे. असे पोलीस निरीक्षक म्हणाले.
महिला अत्याचार व पोक्सो प्रकरणात पोलिसांची भूमिका संदेहास्पद आहे अशी प्रतिक्रिया पीडित युवतीच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने