महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

Crime storys
वर्धा - सकाळी सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या भीमराव सिंगरे यांना सत्याग्रही घाट परिसरात एका महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळला, wardha crime
याबाबत त्यांनी तात्काळ याची माहिती तळेगाव पोलिसांना दिली, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सकाळच्या सुमारास तळेगाव निवासी भीमराव सिंगरे हे नागपूर-अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाट परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेले होते, महामार्गापासून तब्बल 300 फूट अंतरावर त्यांना एका महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळला, याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
सदर मृतदेह हा 30 ते 40 वयोगटातील महिलेचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे, महिलेची हत्या करण्यात आली असावी यावर पोलिसांनी तपास सुरू केला. Maharashtra crime news
घटनास्थळी पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी भेट देत तपास अधिकाऱ्यांना घटनेचा उलगडा करण्याचे निर्देश दिले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने