चंद्रपूर जिल्ह्यातील तलावात आढळला महिलेचा मृतदेह

चंद्रपूर जिल्ह्यातील तलावात आढळला महिलेचा मृतदेह

Crime story's

t
चंद्रपूर/ब्रह्मपुरी - चंद्रपूर जिल्ह्यात दररोज घटनेत वाढ होत आहे, जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे 2 दिवसांपूर्वी एका तरुणीने लग्न मोडले म्हणून गळफास घेत आत्महत्या केली होती, त्या घटनेला 2 दिवस उलटत नाही तर शहरातील शेष नगर जवळ बारई तलावात एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. Maharashtra crime news
सदर मृतक महिला ही आझाद वार्ड कुरखेड येथील निवासी रेखा बुराडे असल्याची माहिती मिळाली आहे. Chandrapur crime
त्या महिलेची आत्महत्या की हत्या याबाबत अद्याप काही कारण स्पष्ट झाले नाही, पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार 57 वर्षीय रेखा बुराडे या काही दिवसांपासून आजारी होत्या, त्या याआधी सुद्धा घरून कुणाला न सांगता निघून गेल्या होत्या, त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज व माहिती प्रमाणे पोलिसांनी लावला आहे.
पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी स्वाती फुलेकर करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने