एका हातात धारदार शस्त्र तर दुसऱ्या हातात पत्नीचे शीर

एका हातात धारदार शस्त्र तर दुसऱ्या हातात पत्नीचे शीर

Crime story's
परभणी - आज देशात अनेक क्रूर हत्येच्या घटना समोर येत आहे, सदर गुन्हेगारीमुळे अनेक ठिकाणी दहशत माजत आहे.
श्रद्धा वालकर हत्याकांडांनातर राज्यात अनेक निर्घृण हत्याकांड उघडकीस आले. पण आजही असे गुन्हे घडत आहे. Parbhani crime 

असाच एक धक्कादायक प्रकार परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कमलापूर येथे घडला.
कमलापूर येथे मोरे कुटुंब गुण्या गोविंदाने राहत होते, मोरे कुटुंबात पती-पत्नी, 2 मुली व 1 मुलगा आहे. Maharashtra crime news
29 नोव्हेंम्बरला रात्रीच्या सुमारास 43 वर्षीय केशव गोविंदराव मोरे घरी धारदार शस्त्र घेऊन आले, त्यांनी कसलाही विचार न करता पत्नी 37 वर्षीय आशाबाई यांच्या चेहऱ्यावर वार केले, या हल्ल्यात आशाबाई यांचा चेहरा विद्रुप झाला, त्यानंतर केशव ने पत्नीचे शीर धडावेगळे केले. Brutal murder
मात्र केशव इतक्यावर थांबला नाही तर त्याने एका हाती शस्त्र तर दुसऱ्या हातात पत्नीचे शीर घेत घरासमोर फिरू लागला.
सदर प्रकार शेजारी व नातेवाईकांनी बघितल्यावर त्या परिसरात चांगलीच दहशत माजली.
घटनेची माहिती ताडकळस पोलिसांना मिळाली त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी केशव ला अटक केली.
हत्येचं कारण त्याला विचारलं असता सध्यातरी अस्पष्ट आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने