हनिट्रपच्या जाळ्यात अडकला सेल्स मॅनेजर

हनिट्रपच्या जाळ्यात अडकला सेल्स मॅनेजर

Crime story's
पुणे - देशात ऑनलाइन युगात अनेक नवीन गुन्हे घडत आहे, सायबर गुन्हेगारी असो की सेक्सटोर्शन या गुन्ह्यात सतत वाढ होत आहे.

पुण्यात एक नवीन हनी ट्रॅप चा प्रकार उघडकीस आला आहे, महाविद्यालयीन तरुण - तरुणी यांनी 53 वर्षीय व्यक्तीला हनिट्रप मध्ये अडकवीत खंडणी वसूल केली. Pune crime
एका खासगी कंपनीत 53 वर्षीय फिर्यादी हा सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो, सेल्स चे काम असल्याने फिर्यादी हा राज्यात, जिल्ह्यात विविध ठिकाणी जात असतो, एकेदिवशी हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांची 18 वर्षीय तरुणीशी ओळख झाली, माझ्याकडे अनेक मुली आहे जर आपल्याला मुली लागत असेल तर माझ्याशी सम्पर्क करा असे तरुणीने मॅनेजर जवळ सांगितले.
त्यावेळी फिर्यादीला तरुणीने 2 तरुणांचे मोबाईल क्रमांक देत गरज भासल्यास सम्पर्क साधण्याचे आवाहन केले. Honey trap
सेल्स मॅनेजर ने काही दिवसानंतर त्या तरुणांना कॉल केला, त्या तरुणांनी फिर्यादीला मुली देण्याचे बतावणी केली. Maharashtra crime news
तरुणांनी फिर्यादीला इन्स्टाग्राम वरील अनोळखी मुलींचे फोटो सुद्धा पाठविले, त्यांना पोरवाल मार्गावर भेटण्यासाठी बोलाविले, फिर्यादी हे स्वतःच्या वाहनाने तिथे गेले, त्यावेळी त्यांना त्या तरुणांनी मारहाण करीत फिर्यादीचे अपहरण केले.
तसेच त्यांना निर्जंनस्थळी नेत पत्नी व नातेवाईकांना तुमच्या या छंदा बद्दल माहिती देत बदनामी कारणार असे सांगितले. Extortion
त्यावेळी फिर्यादी जवळून त्या तरुणांनी 93 हजार रुपये सुद्धा उकळले, त्यानंतर ते तरुण फिर्यादीला पैसे मागत होते, पैसे न दिल्यास तुझ्या कुटुंबाला ठार मारू अशी धमकी सुद्धा दिली.
सततच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी ने याबाबत पोलिसात तक्रार दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भापकर, उपनिरीक्षक सातपुते व महिला उपनिरीक्षक शुभांगी मुगदम यांनी आरोपींचा शोध घेतला, 19 वर्षीय व धिरज वीर व 19 वर्षीय जॉय मंडल सहित एका अल्पवयीन ला ताब्यात घेतले मात्र ती तरुणी पसार झाली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने