5 व्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

5 व्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Crime story's
पुणे/राजगुरू नगर - पुण्यातील राजगुरूनगर भागात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे, आरोपीने अल्पवयीन मुलीला शाळेत जाऊन आणत लॉज वर नेत बलात्कार केला, त्यानंतर तिला परत शाळेत नेऊन सोडले. Pune crime
आरोपी 42 वर्षीय कल्याण सोनबा राक्षे व पीडितेचे वडील दोघेही मित्र होते, आरोपीचे पीडितेच्या घरी नेहमी जाणे-येणे होते. 
आरोपी वडिलांचे मित्र असल्याने पीडित त्याला ओळखत होती.
पीडित मुलगी ही जिल्हा परिषद शाळेत 5 व्या वर्गात शिकत होती, 23 डिसेंम्बरला आरोपी सोनबा पीडितेच्या शाळेत जात, वडील घरी बोलावीत असल्याचे सांगितले, पीडितेने त्यावर विश्वास ठेवत बाहेर आली मात्र आरोपीच्या मनात काही ओर होत, त्याने घरी न नेता तिला लॉज वर नेले. Maharashtra crime news
लॉज वर आरोपीने पीडितेवर बलात्कार केला त्यानंतर पीडितेला परत शाळेत नेऊन सोडले, घडलेल्या या प्रकाराने पीडित मुलगी घाबरून गेली होती, तिने सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला.
गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तात्काळ आरोपी सोनबा ला अटक केली.
राजगुरूनगर येथील नागरिकांनी शाळेतील शिक्षकावर नाराजी व्यक्त करीत पीडित मुलीला बाहेर जाऊ कसे दिले यावर संताप व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने