चंद्रपूर जिल्ह्यात मित्राने केली मित्राची हत्या

चंद्रपूर जिल्ह्यात मित्राने केली मित्राची हत्या

Crime storys
राजुरा - चौवा-अष्टा खेळू देत नसल्याचा क्षुल्लक कारणावरून मित्राने आपल्या मित्राच्या पोटात लोखंडी सुरी ने वार केल्याची दुर्दैवी घटना बामनवाडा येथे घडली, या हल्ल्यात मित्राचा मृत्यू झाला. trivial cause
राजुरा तालुक्यातील बामनवाड़ा येथे सकाळी 9 वाजता ग्रामपंचायतीच्या मागे स्थानिक चौवा-अष्टा खेळ खेळत होते, यावेळी 31 वर्षीय शक्ती सुरेश टेकाम हा मला पण खेळ खेळू द्या असा म्हणू लागला मात्र शक्ती चा मित्र 22 वर्षीय महादेव शंकर कोडापे ने त्याला खेळू नको असे म्हटले.
शक्ती व महादेव यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, वाद वाढला, वादाचं रूपांतर मारहाणीत झाले.
Chandrapur crime
मनात राग भरत शक्ती घरी गेला आणि घरून पाणी आणत त्यांच्या खेळावर टाकले, त्यानंतर सुद्धा शक्ती चा राग शांत झाला नाही, पुन्हा घरी जात शक्तीने लोखंडी सुरा आणला व फोनवर बोलत असलेल्या महादेवच्या पोटात वार केले.
रक्तबंबाळ झालेल्या महादेवला त्याच्या मित्रांनी तात्काळ राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, गंभीर अवस्थेत जखमी असलेल्या महादेव ला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रेफर केले, चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Chandrapur murder news
मृतक महादेव कोडापे हा बामनवाडा येथे मागील अनेक वर्षांपासून वास्तव्याने राहत असून तो मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. महादेव आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. Maharashtra crime news
यावेळी बामनवाडा येथे तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती राजुरा पोलिसांना मिळताच ते लगेच घटनास्थळी पोहचले व मृतदेह उत्तरीय तपासणी करून गावात आणण्यात आला. यावेळी घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने