मनसे महिला जिल्हाध्यक्ष वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मनसे महिला जिल्हाध्यक्ष वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Crime story's
नवी मुंबई/रायगड- वर्षभरापूर्वी मनसे पक्षात प्रवेश करीत महिला जिल्हाध्यक्ष पद भूषविणाऱ्या अदिती सोनार यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सोनार यांनी काही दिवसांपूर्वी पनवेल येथील विहिघर परिसरात असलेल्या शेतजमिनीवर बांधकाम केले होते. Mns adhikrut


त्यासाठी त्यांनी शेतजमीन बिगर शेती असल्याचे दाखवीत जिल्हाधिकारी यांची खोटी सही व शिक्क्यांचा वापर केला.
यासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी यांना तक्रार प्राप्त होताच याप्रकरणी चौकशी करण्यात आली, त्यामध्ये अदिती अदिती सोनार यांनी बनावट सही व शिक्क्यांचा वापर केला असल्याचे निदर्शनास आले. Mns crime
याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तहसील कार्यालयातर्फे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. Maharashtra crime news
सोनार या पनवेल व उरण तालुक्याच्या मनसे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने मनसे पक्षात चांगलीच खळबळ उडाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने