दारूच्या नशेत मुलाने केली आईची हत्या

दारूच्या नशेत मुलाने केली आईची हत्या

Crime story's
बिहार - जमुई जिल्ह्यातील केवाल गावात घरगुती वादात एकाने दारूच्या नशेत आईची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे, आईच्या हत्येनंतर मुलाने घटनास्थळावरून पळ काढला.
40 वर्षीय काशी मांझी हा शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत घरी आला असता भावाच्या मुलांसोबत त्याचा वाद झाला. Bihar crime
त्यानंतर ते भांडण भावासोबत सुरू झाले, दोघा भावांचा वाद विकोपाला पोहचला असता दोघांची आई 60 वर्षीय धरणी देवी वाद सोडवायला मध्ये पडल्या. India crime news
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या काशी ने आईच्या डोक्यावर काठीने मारहाण केली, अचानक झालेल्या या हल्ल्यात धरणी देवी जमिनीवर कोसळल्या, त्यानंतर काशी ने जमिनीवर पडलेल्या आईच्या कपाळावर दगडाने हल्ला केला यामध्ये धरणी देवी चा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर काशी ने भाऊ व वडिलांवर हल्ला करीत दोघांना जखमी करीत तिथून पळ काढला, ग्रामस्थांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली. Murder
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले मात्र तोपर्यंत काशी ने पळ काढला होता, आईच्या हत्येप्रकरणी काशी वर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस काशीचा शोध घेत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने