चालत्या कारमध्ये मॉडेलवर अत्याचार

चालत्या कारमध्ये मॉडेलवर अत्याचार

Crime story's
केरळ - एका प्रेमाचे 35 तुकडे करणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाचे प्रकरण ताजे असताना केरळ येथे 19 वर्षीय मॉडेल वर चालत्या गाडीत बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

Model gang rape
या प्रकरणात केरळ पोलिसांनी 4 आरोपीना अटक केली आहे, विशेष म्हणजे यामध्ये एका मुलीचा ही समावेश आहे.
केरळ मधील कोची जवळ असणाऱ्या कोडुंगल्लुर येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास पीडित मुलीला तिच्या मैत्रिणीने डीजे पार्टीत आमंत्रित केले होते.
कोचीन शिपयार्ड मधील पब मध्ये ही पार्टी सुरू होती.
पार्टीत पीडितेच्या मैत्रिणीने संशयित आरोपी सोबत तिची ओळख करून दिली होती.
पार्टी संपल्यावर आरोपीनी पीडितेला घरी सोडण्याच्या बहाण्याने कार मध्ये बसविले, आधी आरोपीनी पीडितेला मारहाण केली नंतर तिघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केला.
यावेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते, अत्याचारानंतर पीडितेला कक्कनड या गावी सोडून फरार झाले.
पीडितेच्या मैत्रिणीने तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले, पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर सदर बाब उघडकीस आली.
केरळ च्या आरोग्य व महिला बालविकास मंत्री विना जॉर्ज यांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपींवर कडक कारवाई होणार असे सूचक विधान करीत पीडितेवर योग्य उपचार व्हावे यासाठी रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने