चोरीच्या संशयावरून युवकाची हत्या

चोरीच्या संशयावरून युवकाची हत्या

Crimestorys
यवतमाळ - जिल्ह्यात चोरीच्या संशयावरून एका युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, पोलिसांनी या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
बाभूळगाव तालुक्यातील मादणी येथील 39 वर्षीय मंगेश लक्ष्मण डेहणकर असे मृत तरुणाचे नाव आहे. Yavatmal crime
बस स्टॅण्ड परिसरातील एका हॉटेलमध्ये मंगेश चा मृतदेह आढळला होता, सुरुवातीला मंगेश हा अति मद्यपान केल्यामुळे मरण पावला असे सर्वाना वाटले होते, मात्र मंगेश चा मृतदेह शवविच्छेदन साठी पाठविला असता त्यानंतर त्याचा मृत्यू नैसर्गिक नसून बेदम मारहाणीमुळे झाला असे निष्पन्न झाले. Murder crime
या प्रकरणात मृतक मंगेश चा भाऊ गजानन डेहणकर याचा भाऊ गजानन याने बाभूळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली, पोलिसांनी विविध कलम दाखल करीत घटनेचा तपास सुरू केला त्यांनतर 3 आरोपी 32 वर्षीय निलेश गजानन जतकर, 28 वर्षीय संतोष सुरेश चौधरी व 30 वर्षीय सागर गजानन जतकर यांना अटक करण्यात आली. Brutal murder
शेतातील साहित्य चोरी जात असल्याने आरोपीनी चोरीचा संशय मंगेश वर घेतला होता, आरोपीनी मंगेश ला गावात गाठत त्याला शेतातील झाडाला बांधले, तिघांनी मिळून त्याला लाठ्या काठ्याने बेदम मारहाण केली.
गंभीर जखमी अवस्थेत आरोपीनी मंगेशला हॉटेलमध्ये नेले, जखमी अवस्थेत असलेल्या मंगेशने हॉटेलमध्ये प्राण सोडले.
घटनेचा पुढील तपास बाभूळगाव पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने