गुटख्यासाठी युवकाची हत्या

गुटख्यासाठी युवकाची हत्या

Crime story's
मध्यप्रदेश - आजकाल तरुण पिढीला वेगवेगळ्या व्यसनाने ग्रासले आहे, दारू, अंमली पदार्थ याहून अधिक व्यसन तरुण पिढीला जडले आहे.
मात्र व्यसनापायी एका युवकाने आपला जीव गमावला. Youth murder
सदर धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील ग्वालीयर मध्ये घडली.
26 वर्षीय संजय शाक्य या युवकाला व्यसन करण्याची सवय होती, ते नेहमीच नशेत राहत होता. Gutkha 
कंपू पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ललीतपुर कॉलोनी मध्ये संजय राहत होता, त्याच कॉलॉनिमध्ये करन सिंह यांची दुकान होती, त्या दुकानातून संजय ने 5 रुपयांचा गुटखा विकत घेतला, दुकानदाराने संजय ला पैसे मागितले असता संजय ने शिवीगाळी करायला सुरुवात केली. Pan masala
संजय ने गुटख्याचे पाऊच घेत तिथून पळ काढला, दुकानदाराने लगेच आपल्या मुलाला आवाज मारत त्याला बोलाविले, दुकानदाराचा मुलगा सचिन हा हातात लोखंडी रॉड घेऊन आला, संजय ला पकडत त्याने रॉडणे हल्ला केला, दुकानदार व त्याच्या मुलाने संजय ला बेदम मारहाण केली.
संजय ला दोघांनी इतकं मारलं की त्याचा जागीच मृत्यू झाला, संजय मृत पावला असल्याचे जाणवीत आरोपी पिता-पुत्राने तिथून पळ काढला, मात्र ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
पोलिसांनी आरोपी पिता-पुत्राला अटक केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने