पतीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पत्नीचा जादूटोणा, गमावले 60 लाख रुपये

पतीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पत्नीचा जादूटोणा, गमावले 60 लाख रुपये

Crime story's
मुंबई - पती आपल्या नियंत्रणात रहावा, त्यांनी फक्त आपलेच ऐकावे असे एका महिलेने गृहीत धरत एका ज्योतीशीचा आधार घेतला मात्र त्या भोंदू बाबाने महिलेकडून लाखो रुपये उकळले.
याबाबत पतीला कळताच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, नंतर प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. Mumbai crime

अंधेरी मध्ये महिलेच्या पतीचा प्रिंटर व कारटेज चा व्यवसाय आहे, तो आपल्या कुटुंबासहित पवई येथे राहतो.
दिवाळी मध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना बोनस स्वरूपात देण्यासाठी 35 लाख रुपयांची रोख रक्कम घरी ठेवली होती. रक्कम काढण्यासाठी ज्यावेळी कपाट बघितले असता त्यामधून रोख रक्कम गायब होती. Maharashtra crime
रक्कमेबाबत पत्नीला विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र त्यानंतर पत्नीला विश्वासात घेतले असता तिने याबाबत धक्कादायक माहिती दिली.
माझा पती माझ्या मर्जीत असावा मी जे म्हणेल तसं ऐकून तसंच वागायला हवा यासाठी महिलेने समाज माध्यमात शोध सुरू केला, त्यांनतर Instagram ज्योतिष बादल शर्मा सोबत त्या महिलेची ओळख झाली.
पतीला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला जादूटोणा करावा लागेल मात्र त्यासाठी खर्च लागणार असे म्हणत त्या महिलेकडून बादल ने सोन्याचे दागिने व रोख 35 लाख रुपये असा एकूण 60 लाख रुपये लाटले. witchcraft
ही सर्व बाब कळल्यावर पतीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली, विशेष म्हणजे त्या महिलेने या कारनाम्यात आपल्या पूर्व प्रियकराची मदत घेतली होती, पोलिसांनी त्याला सुद्धा सहआरोपी बनविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने