उकळत्या तेलात टाकले पत्नीचे डोके

उकळत्या तेलात टाकले पत्नीचे डोके

Crime story's
मध्यप्रदेश/इंदोर - दारू पिणाऱ्याला न सांगता दारू सोडवा, असे व्यसनमुक्ती संस्था नेहमी सांगत असतात.
काही नकळत दारू सोडवण्यासाठी प्रयत्न करतात तर काही स्वतः पुढाकार घेतात, मात्र पतीची दारू सुटावी यासाठी काही औषधी तर देत नाही न या संशयावरून पतीने पत्नीचे डोके उकळत्या तेलात टाकले. Indore crime
सदर धक्कादायक घटना इंदोर मधील जुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टॉवर चौकात घडली, चौकीदार म्हणून काम करणाऱ्या सुदामा हिरवे याला दारूचे अतिव्यसन होते. Addiction to alcohol
काही दिवसांपासून सुदामा हा आजारी राहत होता, आपली दारू सोडवण्यासाठी पत्नी रंजना हिरवे ही जेवणात काही आयुर्वेदिक औषधी तर देत नाही असा संशय सुदामाला होता.
बुधवारी रात्री सुदामा जेव्हा घरी आला तेव्हा त्याची पत्नी रंजना स्वयंपाक करीत होती.
रंजना ला बघताच सुदामा चा राग अनावर झाला त्याने सरळ रंजना चे केस पकडून उकळत्या तेलात तिचे डोके टाकले.
पतीच्या या राक्षसी कृत्यावर रंजना ने प्रतिकार करीत आरडाओरडा केला, शेजारी धावले व सुदामा याला पत्नीपासून वेगळे केले.
या कृत्यामुळे पत्नी रंजना चा चेहरा भाजला, ती यामध्ये गंभीर जखमी झाली. Brutal crime
महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पोलिसांना रंजना ने झालेली संपूर्ण बाब कथन केली, इंदोर पोलिसांनी तात्काळ 307 चा गुन्हा सुदामा वर दाखल करीत त्याला अटक केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने