पोलिसांच्या बहुरुपी तपासात अलिबाबा गॅंग मधील दोघांना अटक

पोलिसांच्या बहुरुपी तपासात अलिबाबा गॅंग मधील दोघांना अटक

Crime story's
मुंबई - गंभीर गुन्हे घडले की त्याचा शोध लावण्यासाठी पोलिसांना जीवाचे रान करावे लागते, कधी तर आरोपींच्या शोधात महिना निघून जातो तरीही न थकता पोलीस आपलं कर्तव्य बजावतात.
Mumbai theft crime
अश्याचं एका गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना सुद्धा बहुरूपी व्हावे लागले, पोलिसांना कधी पोस्टमन तर कधी हातगाडी वाल्याची भूमिका साकारावी लागली, मात्र शेवटी पोलिसांना आरोपी गवसलेचं.
31 डिसेंबर 2021 रोजी मुंबई येथील दहिसर पूर्व चुनाभट्टी परिसरातील सचिन नगरातील फ्लॅट मधून तब्बल 933 ग्राम सोन्याचे दागिने व रोख 40 हजारांच्या रक्कमेवर चोरांनी डल्ला मारला होता.
त्या चोरट्याना पकडण्यासाठी पोलिसांना 167 सीसीटीव्ही व 97 सिमकार्ड चे लोकेशन तपासावे लागले. Mumbai police
चोरट्यानी वापरलेले सिमकार्ड हे अलिबाबा च्या नावाने येत असल्याने पोलिसांना त्या टोळी ला अलिबाबा गॅंग असे नाव दिले होते.
11 महिने तपास करून अलिबाबा टोळीतील 2 सदस्यांना पोलिसांना पकडण्यात यश आले.
चोरी प्रकरणात 2 चोर, 1 सोनार चोरीचा माल जप्त करण्यात आला. Alibaba gang
चोरांचे नाव हैदर अली सैफी व सलमान अन्सारी अशी आहेत तर चोरीचा माल विकत घेणाऱ्या सोनाराचे खुशाल वर्मा असे नाव आहे.
पोलिसांनी चोरांकडून 18 लाखांचा सोन्याचा तुकडासुद्धा जप्त केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने